दि एज्युकेशन सोसायटीचे,
पी. डी. कारखानीस महाविद्यालय, अंबरनाथ
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, महाराष्ट्र सरकार व मुंबई विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पी. डी. कारखानीस महाविद्यालय, अंबरनाथ व अंबरनाथ नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने कोविड लसीकरण विशेष शिबिर दि. २७ व २८ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या दरम्यान राबविण्यात येत आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी या विशेष लसीकरण शिबिराचा लाभ घ्यावा
कोविड लसीकरण ठिकाण :👇🏻
शिवदर्शन बंगलो, स्वामी समर्थ चौक, आंध्रा बँकेजवळ, अंबरनाथ (पूर्व)
टिप :
१. लसिकरणासाठी १८ वर्षे वय पूर्ण असावे.
२. सोबत आधार कार्ड आणणे आवश्यक आहे.
३. महाविद्यालयात प्रवेश घेतलेली फी पावती आणणे.
डॉ. वंदना पुरव
(प्र-प्राचार्या)